Home > District Landmarks


 

जिल्ह्यातील आकर्षित खुणा

 

                               राधानगरी हायड्रो-ईलेक्ट्रीक योजना

 

हा जिल्ह्यातील मुख्य कालवा आहे. सुरूवातीला ही योजना कोल्हापूर जिल्ह्याचा विधाता छत्रपती शाहु महराजांच्या कालवा योजनेच्या योजनेअंतर्गत सुरू करण्यात आली. भोगावती नदीवर बांधण्यात आलेल्या ह्या कालव्यात प्रसिध्द अभियंता विश्वेश्वराय यांचा समावेश करण्यात आला. ह्याची बांधणी 1917 मध्ये 40 फुटांपर्यंत करण्यात आली आणि 1946 नंतर काही प्रमाणात बांधणी केली, हा प्रकल्प 1957 मध्ये पुर्ण झाला. 126 फुट नदीवर, 140 फुट ऊंचीचा व 18.4 फुट रूंदीचा हा कालवा आहे. ह्याची पाणी साठवुण ठेवण्याची क्षमता 239.53 MCFT आहे आणि 26560 एकर क्षेत्रात विस्तारला आहे.

 

हा एक 24 MW क्षमता असलेला विद्युत प्रकल्प आहे.ह्या प्रकल्पाचा बराचसा भाग राधानगरी, करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्याच्या कालवे प्रकल्पात येतो.हा प्रकल्प कालवे प्रकल्पांच्या योजने मध्ये सुरु करण्यात आला.

डेअरी सहकारी योजना

Milk Collection

कोल्हापूर जिल्हा हा दुध ऊत्पादनामध्ये अग्रेसर जिल्हा आहे आणि येथुन मोठ्या प्रमाणात दुध आणि  दुधाच्या पदार्थांची निर्यात केली जाते. दुध ऊत्पादनामध्ये गोकुळ, वारणा व मयुर हे अग्रेसर संघ आहेत, त्यामध्ये सहकारी तत्वावर आधारीत गोकुळ सर्वात मोठा आहे.

 

वारणा संघ हे  एक श्रेष्टत्वाचे ऊदाहरण आहे आणि ऊत्कृष्ट ग्रामीण प्रकटीकरण ही एक खरीखुरी गोष्ट आहे. कै. श्री. तात्यासाहेब कोरे, ज्यांच नाव भारतामध्ये सहकार क्षेत्रामध्ये आदराण घेतल जात. त्यांनी वारणानगर मध्ये 1959 साली बहुऊद्देशीय हेतुने साखर कारखान्याची स्थापना केली.

 

महाराष्ट्र राज्यामध्ये 1930 पासुन कोल्हापूर जिल्हा चित्रीकरणामध्ये अग्रेसर जिल्हाम्हणुन ओळखला जातो. येथे मराठी, ईतिहासकालीन चित्रपटांचे मराठीमध्ये चित्रीकरण केले जाते.

जयप्रभा व शांतीकिरण हे दोन येथील मुख्य स्टुडिओ आहेत.

 

पहीले सोन्याचे जडणघडणीचे काम हुपरी येथे 1904 साली सुरु झाले व लवकरच ही नगरी सोन्याची नगरी म्हणून राज्यामध्ये व भारतामध्ये ओळखले जाऊ लागली.

 

शेती ऊत्पादनामध्ये शेतकरी अग्रेसर होण्यासाठी 1945 साली मार्केट यार्डची स्थापना केली व गडहिंग्लज मधील शेतकरी अग्रेसर होण्यासाठी 1948 साली मार्केट यार्डची स्थापना केली. मार्केटींगसाठी शाहुपुरी व पिराजीराव पेठ ही दोन मुख्य ठिकाणे आहेत.

 

भारतीय रेल्वे नकाशावरुन मिरज-कोल्हापूर रेल्वे लाईनची सुरूवात 21 एप्रिल 1891 साली झाली.

 

जनतेला वैद्यकीय सुविधा पुरविण्यासाठी छत्रपती प्रमिला राजे हॉस्पिटलची 1884 मध्ये स्थापना करण्यात आली, 2001 साली ह्र्दयविकार केंद्राची स्थापना केली, काही शासकीय दवाखान्यांमधील हा एक दवाखाना आहे ज्याच्यामध्ये अशाप्रकारच्या सुविधा पुरविल्या जातात.

 

 

वारणा खेडे तारांकीत प्रकल्प (WWVP)

हा ग्रामीण भागासाठी असलेला देशातील सुरुवातीचा प्रकल्प आहे, ह्याचा हेतु ग्रामीण भागातील जनतेला माहिती तंत्रज्ञानाची ओळख करुण देण्यासाठी केला गेला.