Home > Application Form > Related GR

                                                                       Related GR
 

 

महाराष्ट्र शासन

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग

शासन निर्णय क्रमांक : विसयो 2008/प्र.क्र.78/विसयो-1

मंत्रालय विस्तार भवन, मुंबई - 400 031

दिनांक : 30 सप्टेंबर , 2008

 

प्रस्तावना :-

 

महाराष्ट्र शासनाने निराधार वृध्द व्यक्ती, अपंग, शारिरीक व मानसीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवांना अर्थसहाय्य देण्याच्या हेतुने संजय गांधी निराधार / आर्थिक दुर्बलांसाठी अनुदान योजना सन 1980 मध्ये सुरू केली. या योजनेअंतरगत सध्या प्रतिमाह प्रति लाभार्थी रू. 250/- एवढे अनुदान देण्यात येत आहे.

 

     तदनंतर निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवा यांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना सन 1991 पासुन सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या रू. 250/- प्रतिमाह प्रती लाभार्थी एवढे अनुदान देण्यात येत आहे.

 

    तसेच केंद्र शासनाने 65 वर्षावरील आर्थिकदृष्ट्या निराधार व्यक्तींसाठी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना सन 1995 मध्ये सुरू केली. या योजनेअंतर्गत रू. 200/- निवृत्तीवेतन सध्या देण्यात येत आहे. राज्य शासनाने या योजनेस पुरक अशी श्रावनबाळ सेवा योजना सन 2004 मध्ये सुरु केली. या योजनेअंतर्गत 65 वर्षावरील व्यक्तीस दरमहा रू 175/-

अनुदान देण्यात येत आहे. असे 65 वर्षावरील प्रत्येक लाभार्थ्याला एकूण रू.375/- निवृत्तीवेतन दरमहा मिळते.

 

    या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये काही अडचणी येत असून या योजनांच्या निकषात उदा:- लाभार्थ्यांच्या मुलांचे वय 18 वर्षे झाल्यानंतर त्याला अनुदान द्यावयाचे नाही व या मुलांना 18 वर्षानंतर लगेच नोकरी मिळेल याची शाश्वती नसल्याने ही वयोमर्यादा वाढविणे तसेच कुटूंबाची सद्याची वार्षीक उत्पन्न मर्यादा रू. 15,000/- ही फारच कमी असल्याने त्यामध्ये वाढ करावी आणि वाढत्या माहागाईमुळे सध्याच्या अनुदानात

 

वाढ करावी अशी मागणी लोकप्रतिनिधी व निराधार व्यक्ती शासनाकडे सातत्याने करीत आहेत. वरील अडचणी लक्षात घेऊन लाभार्थ्यांच्या निवडीचे निकष, निवड प्रक्रीया व लाभ वितरण पध्दत यामध्ये सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

 


read more..

 

123