Home > Application Form > Related GR(Page No. 2)

 

                                                               Related GR

शासन निर्णय :-

        केंद्र व राज्य पुरुस्कृत सामाजिक अर्थसहाय्य योजना

 

अ.क्र.

योजना

तपशील

1

संजय गांधी निरधार अनुदान योजना

संजय गांधी निरधार अनुदान योजनेअंतर्गत 65 वर्षाखालील निराधार महिला, अनथ मुले, अपंगतील सर्व प्रवर्ग, घटस्पोट प्रक्रियेतील महिला यांना या योजनेचा लाभ दिला जातो. या योजनेमध्ये 21,000/- ऊत्पन्न मर्यादा आहे. या योजनेखाली पात्र होणार्‍या कुटुंबात एक लाभार्थी असल्यास रू.750/- इतके आर्थिक सहाय्य दिले जाते.

 

पात्रतेची अर्हता -

1)अपंगातील अस्थिव्यंग, अंध, मुकबधीर, कर्णबधीर, मतिमंद इ. स्त्री-पुरूष.

2)क्षयरोग, पक्षाघात, प्रमस्तिष्कघात कर्करोग, एड्स, कृष्टरोग इ. स्त्री-पुरूष.

3)शेतमजूर महिला.

4)अनाथ महिला.

5)निराधार विधवा घटस्पोट प्रक्रियेतील व घटस्पोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या, अत्याचारीत व वेश्या व्यवसायातून मुक्त केलेल्या महिला.

6) 18 वर्षाखालील अनाथ मुले.

 

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे -

1)विहीत नमुन्यात अर्ज.

2)वयाचा दाखला.

3)तहसिलदार/उप विभागीय अधिकारी यांनी दिलेला उत्पन्नाचा दाखला.

4)ग्रामसेवक/तलाठी/मंडल अधिकारी/नायब तहसिलदार/ तहसिलदार यांनी दिलेला रहिवाशी दाखला.

5)शल्यचिकित्सक यांचे अपंगाचे प्रमाणपत्र.

6)जिल्हा शल्यचिकित्सालक यांचा असमर्थतेचा/रोगाचा दाखला.

7) कोणत्याही सरकारी/निमसरकारी/निवासगृहाचा आंतरवासी नसल्याबाबतचा दाखला.

8)अनाथ असल्याचा दाखला.

9)रेशन कार्डची झेरॉक्स प्रत.

2

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना

श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत व 65वर्षावरील दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या निराधार स्त्री व पुरूषांना रू. 300/- प्रतिमहा राज्य शासनाकडून देण्यात येते. याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेचे रु. 200/-प्रतिमहा प्रति लाभार्थी निवृत्ती वेतन देणेत येते. असे एकुण 500/- देणेत येतात.  

 

पात्रतेची अर्हता -

1)65 65 वर्षावरील निराधार स्त्री/पुरुष.

2)दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे यादीत नाव असणे आवश्यक.

 

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे -

1)विहीत नमुन्यातील अर्ज.

2)निराधार असलेचा दाखला.

3)अर्जदाराचा वयाचा दाखला.

4)रहिवासी दाखला.

5)रेशनकार्डाची छायांकीत प्रत.

6)दारिद्र्यरेषेचा दाखला.

3

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्तीवेतन योजना

इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना(केंद्र सरकार) वयोमर्यादा 65 65 वर्षावरील दरिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत नाव असलेल्या स्त्री/पुरूषांना रु.200/- प्रतिमहा केंद्र सरकार व रु. 300/- प्रतिमहा राज्य सरकार यांचेकडून प्रतिमहा रु. 500/- देणेत येतात.

 

पात्रतेची अर्हता -

 

1)65 65 वर्षावरील स्त्री/पुरुष.

2)दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे यादीत नाव असणे आवश्यक.

 

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे-

1)विहीत नमुन्यात अर्ज.

2)अर्जदाराचा वयाचा दाखला.

3)रहिवासी दाखला.

4)रेशनकार्डाची छायांकीत प्रत.

5)दारिद्र्यरेषेचा दाखला.

4

राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना

राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेअंतर्गत प्रति लाभार्थ्यांना रक्कम रु.10,000/- देणेत येते.

 

पात्रतेची अर्हता -

 

1)वयोमर्यादा 18 ते 64 मधील कुटुंब प्रमुख अथवा कर्ता पुरुष मयत झालेल्या.

 

पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे -

 

1)विहीत नमुन्यातील अर्ज.

 

2)ऊत्पन्नाचा दाखला मर्यादा 15,000/-

3)मयताचा वयाचा दाखला.

4)अर्जदाराचा वयाचा दाखला.

5)रहिवासी दाखला.

6)रेशनकार्डाची छायांकित प्रत.

7)दारिद्र्य रेषेखाली नाव असलेबाबतचा तलाठी यांचा दाखला.

 


read more..

 

123